About Us - Sahyadri Film Production House

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शन

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनची स्थापना 2019 मध्ये संस्थापक आणि उद्योजक श्री प्रशांत शिंगाटे यांनी मराठी चित्रपट, कला आणि संस्कृतीचे जगाच्या नकाशावर एक स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने केली.

सह्याद्रीसारखी उत्तुंग भरारी घेण्यासाठी आणि मनोरंजनाच्या दुनियेत आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवव्यासाठी प्रशांत शिंगटे यांनी सह्याद्री फिल्म प्रोडक्शन चे स्थापना केली. आज या सह्याद्रीच्या छताखाली अनेक कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली आणि इथून पुढे ही मिळत राहणार आहे. 

कलेची आवड आणि कळकरांबद्दलचे प्रेम व काम करण्याची धडपड बघून प्रशांत शिंगटे सरांनी सह्याद्री फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली आणि यातूनच का रं देवा चित्रपटाची निर्मिती झाली अशाच या सह्याद्रीच्या सर्वेसर्वा प्रशांत शिंगटे सरांना मानाचा मुजरा...

प्रशांत शिंगटे

अगदी कमी वयात मा.प्रशांत शिंगटे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या बिग बजेट निर्मात्याची चुणूक दाखविली आहे. कोणताही चित्रपट क्षेत्रातील वारसा नसतानाही प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची तयारी, लोकं फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची कला असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. चित्रपट क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणारे मा.प्रशांत शिंगटे सर.

किसी मक्सद के लिए खडे हो तो

एक पेड की तरह

गिरे भी तो बीज की तरह,

ताकि दुबारा उगकर

उसी मक्सद के लिए जंग कर सके..

काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू आहे असे वाठार स्टेशन येथील युवकांचे आयडॉल सातारा जिल्ह्यातील युवकांचे सर्व तरुणात लाडके मा. प्रशांतजी शिंगटे म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील, ग्रामीण भागातील युवकांना चित्रपट क्षेत्रात संधी देणारे , या क्षेत्रात समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे असे आहे.
कोरोना सारख्या आपत्तीमध्येही का रं देवा या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करून बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणारे प्रशांतजी शिंगटे हे एक अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल.

उत्कृष्ट व्यावसायिक व एका कंपनीत नोकरी करीत असताना देखील पैश्याचा काडीमात्र गर्व नसणारे प्रशांत शिंगटे पुन्हा एकदा आपले तेच काम तेच विचार घेऊन पुढे चालत आहेत. त्यांची पुढील वाटचाल अखंडपणे विकासपर्वाकडे चालत आहे.


मा.प्रशांत शिंगटे यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालतात. अगदी कमी वयात त्यांनी आपली उंच अशी यशस्वी वाटचाल केली आहे

कॅमेऱ्याच्या दुनियेतील वारसा नसला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडीलधाऱ्यांकडून मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे.

अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारो युवकांची फळी उभी राहून त्यांच्या पाठीशी जमा होणारे युवक, जीवाला जीव देणारे मित्र पाहता मा.प्रशांत शिंगटे हे फिल्म इंडस्ट्रीजमधील आश्वासक तरुण चेहरा ठरतील हे मात्र नक्कीच.